Wed. Jun 19th, 2019

बहुचर्चित वेब सीरीज सेक्रेड गेम्स मधील बंटीला दुखापत

0Shares

बहुचर्चित असलेली वेब सीरीज सेक्रेड गेम्समधील बंटी अर्थात जतिन सरना हा आगामी चित्रपट  ‘83’ मध्ये  यशपाल शर्मा यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. या भूमिकेसाठी तासन् तास मैदानात क्रिकेटचा सराव करत असताना जतिनला बॉलचा अंदाज आला नसल्याने त्याला दुखापत झाली आहे. हा किस्सा याच चित्रपटातील अभिनेता रणवीर सिंग याने सांगितला आहे.

नेमकं काय घडलं?

अभिनेता रणवीर सिंगने आपल्या आगामी ‘83’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे.

या ‘83’  चित्रपटात सेक्रेड गेम्समधील बंटी अर्थात जतिन सरना हा यशपाल शर्मा यांची व्यक्तिरेखा साकारत आहे.

या भूमिकेसाठी जतिन तासन् तास मैदानात क्रिकेटचा सराव करायचा.

मैदानात सराव करत असताना जतिनला बॉलचा अंदाज आला नसल्याने बॉल  संवेदनशील ठिकाणी लागला.

पण जतिनने एल गार्ड घातले असल्यामुळे त्याला फारशी दुखापत झाली नाही.

या चित्रपटासंबधीतले धडे रणवीर सिंग हा कपिल देव यांच्याकडून घेत आहे.

यासंबधीतले दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे.

 

 

 

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: