दौरा सुरु असताना कृषी राज्यमंत्र्यांची तब्येत अचानक बिघडली
जय महाराष्ट्र न्यूज, वाशिम
वाशिमच्या दौऱ्यावर असलेले कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची तब्येत शनिवारी अचानक बिघडल्याने, त्यांना तात्काळ चिखली येथील योगीराज हॉस्पिटलमध्ये उपचाराकरता दाखल करण्यात आलं आहे.
2 दिवसांच्या बुलडाणा दौऱ्यावर असलेल्या सदाभाऊ खोत यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं आणि त्यांना श्वास घेण्याकरता त्रास जाणवू लागल्याने त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.
सदाभाऊ खोत यांच्या तब्येतीत सध्या सुधारणा असून, डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.