Sun. Jun 20th, 2021

शरद पवारांना येरवडा मध्ये पाठवायला हवं – सदाभाऊ खोत

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ईडीने पाठवलेल्या नोटीस प्रकरणा वरून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. यावर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी जोरदार टीका केली आ

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ईडीने पाठवलेल्या नोटीस प्रकरणा वरून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. यावर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी जोरदार टीका केली आहे. विधान निवडणुकांच्या प्रचारासाठी सभा सुरू असून यावेळी सभेत सदाभाऊ खोत बोलत होते.

राज्यमंत्री सदाभाऊ खोत पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रचारासाठी मंगळवेढा तालुक्यातील भोसे येथे आले होते. यावेळी खोत यांनी भाषणात बोलताना शेतकरी संघटनेमध्ये काम करत असताना आघाडी सरकारने कितीतरी गुन्हे आमच्यावर दाखल केले. त्यामुळे आमची अनेक दिवस कोर्टात हेलपाटा मारण्यातच गेले.

शरद पवार यांनी एकदा आत जाऊन आतली हवा कशी आहे. ते पाहून यावे आत मध्ये जेवायला काय मिळतं ते सुद्धा या माध्यमातून त्यांना समजेल पवार जर येरवडा मध्ये गेले तर महात्मा गांधींच्या शेजारची खोली घेऊन तिथेच राहावं असा सल्लाही खोत यांनी पवारांना दिला, गेल्यानंतर काय दुःख असतं हे आमच्यावर गुन्हे दाखल करणाऱ्या या आघाडीत याने त्यांना कळेल असा टोला त्यांनी लगावला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *