Tue. Aug 9th, 2022

सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी कोल्हापूर सत्र न्यायालयाने सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, सदावर्तेंना जामिनासाठी कोल्हापूर न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. तसेच सदावर्तेंचा ताबा घेण्यासाठी पुणे पोलीस कोल्हापुरात दाखल झाले आहेत.

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात कोल्हापूर येथील शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यानुसार सदावर्तेंना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, आज त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. येथे कोल्हापूर सत्र न्यायालयाने गुणरत्न सदावर्ते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

कोल्हापूरमध्ये गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाला विरोध करून मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच मराठा आणि मागासवर्गीय समाज यांच्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सदावर्तेंनी केला असल्याची तक्रार मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांनी केली आहे. त्यामुळे सदावर्तेंविरोधात १५३ (अ) अंतर्गत कोल्हापुरात गुन्हा दाखल झाला. त्यानुसार, सदावर्तेंना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान, आज त्यांची पोलीस कोठडीची मुदत संपली असून त्यांना १४ दिसवांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.