Tue. Dec 7th, 2021

शेवटी स्वाभिमानी सोडणार; सदाभाऊ खोत यांचे नवीन संघटना काढण्याचे संकेत

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून सदाभाऊ खोत अखेर बाहेर पडण्याचे संकेत मिळत आहेत. सदाभाऊंकडूनच नव्या संघटनेच्या स्थापनेचे संकेत मिळाले आहेत.

 

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सदाभाऊ राज्यव्यापी दौरा करुन कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणार आहेत. सदाभाऊ खोत यांनी आज पुण्यात स्वाभिमानी संघटनेच्या

चौकशी समितीसमोर हजेरी लावली.

 

खेळीमेळीच्या वातावरणात ही चर्चा झाल्याचे समजते. आता चौकशी समिती श्रेष्ठींसमोर हा अहवाल ठेवणार आहे.

 

त्यामुळे निर्णयाचा चेंडू आता राजू शेट्टींच्या कोर्टात आहे. माझ्याबद्दल अपमानकारक शब्द वापरण्यात आले तरीही मी आक्षेप घेतले नाहीत.

 

पण, आता राज्यव्यापी दौरा करुन कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणार असल्याचे सदाभाऊ खोत यांनी म्हटले.

 

तसेच दोन दिवसांच्या शिबीराचं आयोजन करुन शक्तीप्रदर्शन करण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *