Sat. Feb 22nd, 2020

विरोधकांच्या मारक शक्तीमुळे भाजपचे दिग्गज नेत्यांचं निधन, साध्वी प्रज्ञा यांचा विचित्र आरोप

अनेकवेळा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे टीकेच्या धनी झालेल्या साध्वी प्रज्ञा यांनी पुन्हा एकदा नवा वाद ओढावून घेतलाय. गेल्या काही काळात भाजपने आपले अत्यंत महत्त्वपूर्ण नेते गमावले आहेत. मात्र साध्वी प्रज्ञाने याचं खापर चक्क विरोधकांवर फोडलं आहे. एवढंच नव्हे तर त्यासाठी मारक शक्तीचा वापर केला जात असल्याचं विचित्र भाष्यही त्यांनी केलंय. भोपाळ मध्ये अरुण जेटली आणि माजी मुख्यमंत्री बाबुलाल गौर यांना श्रद्धांजली देण्यासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा यांनी हे विधान केलंय

काय म्हणाल्या साध्वी प्रज्ञा?

मला खूप दिवसांपूर्वी एक महाराज म्हणाले होते की भारतीय जनता पार्टीसाठी हा काळ खूप कठीण आहे.

कारण विपक्ष मारक शक्तीचा वापर करतोय.

आत्ता माझ्या लक्षात येतंय की भाजपामधील एकेका वरिष्ठ नेत्यांचं निधन का होतंय.

खरंतर ही गोष्ट मी विसरून गेले होते, पण महाराजांचे शब्द माझ्या आता लक्षात येत आहेत.

तुम्ही विश्वास ठेवा किंवा ठेवू नका. मात्र ही गोष्ट खरी आहे.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी खटला दाखल झालेल्या साध्वी प्रज्ञा यांनी यापूर्वीही अनेकदा वादग्रस्त वक्तव्यं केली आहेत. कधी शहीद हेमंत करकरे यांना आपल्या शापामुळे मृत्यू झाला, असं त्यांनी म्हणून वाद ओढावला होता, तर कधी नथुराम गोडसे यांना देशभक्त म्हटल्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदीही यामुळे साध्वीवर नाराज होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *