Mon. Aug 15th, 2022

जेएनयूच्या बाहेरील रस्त्यावर भगवे झेंडे

रामनवमीच्या दिवशी जवाहरलाल नेहरू विद्यापिठातील झालेला वाद अद्याप संपलेला नाही. आता, जेएनयूच्या बाहेरील रस्त्यावर आणि मुख्य प्रवेशद्वाराजवळ हिंदूसेनेकडून भगवे झेंडे लावण्यात आले आहेत. तसेच या पोस्टर्सवर भगवा जेएनयू असे लिहिले आहे. याच पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

विरोधकांकडून जेएनयूमध्ये भगव्याचा अपमान केला जात असल्याचा आरोप हिंदू सेनेचे उपाध्यक्ष सुरजित यादव यांनी केला आहे. तसेच भगव्याचा अपमान करण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही तुमचा आदर करतो. तुम्ही देखील प्रत्येक धर्म आणि विचारांचा आदर करा, असेही यादव म्हणाले.

रामनवमीच्या दिवशी जेएनयूच्या कावेरी वसतिगृहाच्या मेसमध्ये मांसाहार देण्यावरून हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही विद्यार्थी जखमी झाले होते. अखिल भारतीय परिषदेच्या सदस्यांनी वसतिगृहात येऊन मेस कर्मचाऱ्यांना मांसाहार बनण्यापासून रोखले आणि तेथे उपस्थित विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याचा आरोप डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी केला होता. त्याचवेळी, डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी रामनवमीनिमित्त होणारी पूजा थांबवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अभाविपच्या सदस्यांनी केला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.