Jaimaharashtra news

साईबाबा जन्मस्थान वाद : मुख्यमंत्र्यांची यशस्वी मध्यस्थी, पाथरीच्या विकासासाठी १०० कोटी

साईबाबा जन्मस्थान विवादावर अखेर पडदा पडला आहे. मुख्यमंत्र्यांनी आज बोलावलेल्या बैठकीत हा तोडगा निघाला आहे.

यापुढे साईबाबा जन्मस्थानावरुन वाद होणार नाही, असं आश्वासन बैठकीला उपस्थित असलेल्यांना दिलं.

तुम्हाला पाथरी गावाला विकास निधी देण्यास विरोध आहे का ? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी शिर्डीच्या प्रतिनिधींना केला. यावर आम्हाला कोणत्याही गावाल विकासा निधी देण्यास कोणतीही हरकत नसल्याचं शिर्डीच्या प्रतिनिधींनी सांगितलं.

तसेच मुख्यमंत्र्यांनी पाथरीचा साईबाबांचे जन्मस्थळ हा उल्लेख मागे घेतला. मुख्यमंत्र्यांनीही मागण्या मान्य केल्या असल्याने शिर्डी धर्मस्थान आता संतुष्ट आहे.

आता १०० कोटींचा निधी पाथरीच्या विकासासाठी देण्यात येणार आहे. यामुळे आता पाथरीचा तीर्थक्षेत्र म्हणून विकास करण्यात येणार आहे.

साईबाबांच्या जन्मस्थानावरुन आता काही वाद होणार नाही, असे मुख्यमंत्री आश्वसन देताना म्हणाले.

याबैठकीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार,महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार राधाकृष्ण विखे-पाटील, शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर आदींसह शिर्डी ग्रामस्थ उपस्थिती होते.

दरम्यान साईबाबांच्या जन्म प्रकरणाच्या वादाप्रकरणी रविवारी शिर्डी बंदचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु ग्रामस्थांनी रात्री १२ वाजता हा निर्णय मागे घेतला.

मुख्यमंत्र्यांनी ९ जानेवारीला साईबाबांच जन्म स्थान म्हणून पाथरीसाठी १०० कोटी विकास निधी देणार असल्याची घोषणा केली होती.

Exit mobile version