Sat. May 25th, 2019

खुशखबर! रेल्वे तिकिटासोबत मिळणार साई दर्शनाचा पास  

326Shares

साईभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे, आता साईदर्शनाला येणाऱ्या भाविकांना रेल्वे तिकिटासोबत दर्शनपासही आरक्षित करता येणार आहे.

या सुविधेचा शुभारंभ प्रजासत्ताकदिनी करण्यात आला आहे. शिर्डीमध्ये खास साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरून रेल्वे तिकीट बुक करताना दर्शनाचे पासेस आरक्षित करता येणार आहेत.

ही सुविधा फक्त साईनगर-शिर्डी, कोपरगाव, नगरसूल, मनमाड व नाशिक या स्टेशनचे रेल्वे तिकीट आरक्षित करणाऱ्या साईभक्तांसाठी उपलब्ध असणार आहे.

भाविकांना अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून देणारे साईबाबा संस्थान हे देशातील पहिले देवस्थान ठरले आहे.

तसेच संस्थानच्या वेबसाइटद्वारे यापुढे आरतीसह सत्यनारायण व अभिषेक पूजेची तिकिटेही आगाऊ आरक्षित करता येणार आहे.

या विशेष सुविधांसाठी टाटा कन्सल्टन्सीने सॉफ्टवेअर विकसित केलं आहे.

त्यांनी रेल्वे तिकिटाबरोबर दर्शन पासेससह संस्थानला ऑनलाइनच्या सर्व सुविधा विनामूल्य दिल्या आहेत त्यामुळे संस्थानची किमान 10 कोटींची बचत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *