Sat. Jul 4th, 2020

सई परांजपे यांना साहित्य सन्मान

ज्येष्ठ लेखिका सई परांजपे यांना २०१९ या वर्षाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

सई परांजपे यांनी अनुवादित केलेल्या ‘आणि मग एक दिवस’ या पुस्तकासाठी साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला आहे..

सई परांजपे यांनी अनुवादित केलेल्या ‘आणि मग एक दिवस’ या पुस्तकाचे मूळ लेखक हे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शहा यांनी लिहिलेलं आहे. अॅंड देन वन डे असं या इंग्रजी पुस्तकाचं नाव आहे.

डॉ. के. श्रीनिवासराव हे साहित्य अकादमीचे सचिव आहेत.

यांनी सोमवारी २३ प्रादेशिक भाषांमधील साहित्य प्रकारातील सर्वोत्कृष्ठ अनुवाद साहित्याच्या लेखतकांच्या नावाची घोषणा केली.

यात सई परांजपेंच्या ‘आणि मग एक दिवस’ पुस्तकाची मराठीतील सर्वोत्कृष्ट अनुवादित पुस्तक म्हणून निवड करण्यात आली. ५० हजार रूपये आणि ताम्रपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *