Mon. Dec 6th, 2021

शिर्डीकरांच्या बंद काळातही साईबाबा मंदीर दर्शनासाठी खुलं

शिर्डीकरांनी (Shirdi) पाथरी जन्मस्थळाच्या वादावरून उद्यापासून पुकारलेल्या बेमुदत बंद काळात शिर्डीच्या साईबाबा मंदीर (Saibaba) भक्तांच्या दर्शनासाठी खुलं राहणार आहे. मंदिरातील दैनंदिन कार्यक्रमात कोणतेही बदल केले जाणार नाहीत असं जाहीर करण्यात आलंय. याच बरोबरीने साई संस्थान प्रसादालय, भक्ती निवास रुग्णालयंही खुली राहणार असल्याची माहिती साईबाबा संस्थान मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक मुगळीकर यांनी दिली आहे.

साईबाबांच्या जन्मस्थळाच्या वारंवार केल्या जात असलेल्या उल्लेखामुळे शिर्डीतील ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. या प्रवृत्तीच्या विरोधात आणि साईंची सर्वधर्म समभावाची शिकवण पुसली जाऊ नये म्हणून शिर्डीकर उद्यापासून शिर्डी बेमुदत बंद ठेवणार आहेत.

या काळात साई मंदिरही बंद राहणार असल्याची चुकीची माहिती पसरवली जात असल्याने साई संस्थान प्रशासनाने आज पत्रकार परिषद घेत या बाबत खुलासा केलाय.

उद्या आणि त्या नंतरही साईमंदिरातील कोणत्याही कार्यक्रमात बदल होणार नाहीये.

साईचे मंदिरातील नित्यनियमाचे कार्यक्रम तसेच सुरु राहतील याच बरोबरीने साईसंस्थानच्या वतीने चालवले जाणारे भक्त निवास आणि प्रसादालयही सुरू राहणार आहेत.

त्यामुळे शिर्डीत साईंच्या दर्शन बंदबाबतच्या उठणाऱ्या अपवांनवर विश्वास ठेवु नये असे साई संस्थानच्या वतीने सांगण्यात आलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *