Wed. Dec 8th, 2021

तैमूरच्या धाकट्या भावाच्या नाव सोशल मीडियावर चर्चेत…

मुंबई : करिना कपूर आणि सैफअली खानला २१ फेब्रुवारी २०२१ रोजी त्यांना दुसरा मुलगा झाला. त्यानंतर चाहत्यांनी करिनाला सोशल मीडियावरद्वारे शुभेच्छा दिल्या होत्या त्याबरोबरचं अनेकांनी करिनाला बाळाचे नावही सोशल मीडियाद्वारे सुचविले होते. मात्र पुन्हा एकदा करिनाच्या मुलाचे नाव हे सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. करिना आणि सैफच्या दुस-या मुलाचा जन्म झाला तेव्हापासूनच त्याच्या नावाबद्दल वेगवेगळ्या चर्चा ह्या सोशल मीडियावर होत आहेत. मात्र सध्याला करिनाने याबद्दल अद्याप अधिकृतपणे काहीही माहिती जाहीर केलेले नाही. बॉम्बे टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार करिना आणि सैफ त्याला ‘जेह’ म्हणून हाक मारतात. अर्थात हे त्याचे खरे नाव आहे की टोपणनाव याबद्दल काही अद्याप माहिती नाही.करिनाने त्यांच्या दुस-या मुलाला सोशल मीडियापासून दूरच ठेवले आहे. त्याचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते परंतु त्या फोटोंमध्ये त्याचा चेहरा दिसत नाही. तैमूरच्या जन्मानंतर या दोघांनी त्याचे फोटो सातत्याने सोशल मीडियावर पोस्ट केले होते.
मात्र सध्याला तरी करिनाचा छोटा मुलगा हा प्रसिद्धी माध्यमांपासून दूरच आहे. त्यामुळे चाहते हे त्याच्या नावाविषयी फारच उत्सुक आहे. करिना आणि सैफच्या दुस-या मुलाचे नाव ‘जेह’ असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अर्थात त्याच्या या नावाबद्दल करिना आणि सैफने कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. परंतु काहींच्या मते सैफला त्याच्या दुस-या मुलाचे नाव ‘मंसूर’ असे ठेवायचे आहे. हे नाव त्याच्या वडिलांचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *