Sat. Mar 28th, 2020

‘फुलराणी’ बनली राजकारणी!

बॅडमिंटन कोर्टावरची फुलराणी सायना नेहवालने आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. (Saina Nehwal in BJP) नवी दिल्लीतील भाजपच्या मुख्य कार्यालयात आज सायनाने भाजपप्रवेश करत राजकारणात पाऊल ठेवलं आहे. तिच्या प्रवेशाने आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकांत भाजपला किती फायदा होईल, हे लवकरच कळेल.

दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचार आता अटीतटीचा झाला आहे.

अजूनही दिल्लीत ‘आप’ सरकारचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचंच पारडं जड दिसत आहे.

अशावेळी भाजपने क्रीडा क्षेत्रातील विविध मान्यवरांना आपल्याकडे खेचत प्रचाराची धूरा त्यांच्याकडेसोपवली आहे.

यापूर्वी कुस्तीवीर योगेश्वर दत्त तसंच बबिता फोगट यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि लोकसभा निवडणूकही लढवली होती. मात्र दोघांच्याही पदरी पराभवच आला.

शिक्षण, वीज, पाणी मोफत पुरवण्यामुळे आप सरकारवर मतदार खुश असल्याचं दिसून येतंय. त्यामुळेच अरविंद केजरीवाल यांना टक्कर द्यायला आता भाजपने सायना नेहवालला आपल्या गोटात सामील करून घेतलं आहे.

सायना नेहवालच्या जीवनावर आधारित ‘सायना’ या सिनेमाचं शुटिंगही सध्या सुरू आहे. अभिनेत्री परिणीती चोप्रा या सिनेमात सायनाची भूमिका साकारत आहे. यापूर्वी श्रद्धा कपूर सायनाची भूमिका साकारत होती. या सिनेमाचं दिग्दर्शन अमोल गुप्ते करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *