Thu. Sep 29th, 2022

पेट्रोल ऐवजी पेट्रोल पंपावर पाण्याची विक्री

komal mane

गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथील रिया फ्युल स्टेशन या नावाने असलेल्या ऐसार कंपनीच्या पेट्रोल पंपावर सायंकाळ च्या सुमारास वाहन ग्राहकांनी वाहनांमध्ये पेट्रोल भरून वाहन चालविले परंतु वाहने काही अंतरावर गेल्यावर वाहने बंद पडत असल्याची तक्रारी पुढे आली. यात वाहन चालकांनी वाहने मैकेनिक कडे तपासल्यावर टॅंक मध्ये पेट्रोल नसून पाणी असल्याचे पुढे आले, यावर वाहन धारकांनी पेट्रोल पंपावर धाव घेऊन तपासले असता पेट्रोल ऐवजी पाणीच विक्री होत असल्याची निदर्शनात आले. तर, अनेक वाहनधारकांनी पेट्रोल हे बाटलीत घेतले आणि पाहणी केली तर काय पेट्रोलच्या ऐवजी सरळ पाणीच विक्री होत असल्याचे पुढे दिसून आले आहे.

यावेळी तक्रार करूनही पाणीची विक्री सुरूच होती शेवटी तहसीलदार आमगाव आणि ऐसार कंपनीच्या टोल फ़्री क्रमांकावर ग्राहकांनी तक्रार करताच तहसील अधिकारी यांनी पंचनामा करून पंप बंद केले. परंतु, पंप चालकाने मात्र पेट्रोल ऐवजी पाण्याची विक्री करून वाहनधारकांची लूट केली. आता कंपनी व प्रशासन या पंपचालकांवर काय कारवाई करते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

वाहनधारकांना भुर्दंड आणि नाहक त्रास

दरम्यान पेट्रोल पंपावर ११५ रुपये प्रति लिटर दराने पेट्रोलची विक्री होत आहे. परंतु वाहनांमध्ये पेट्रोल ऐवजी पाणी भरल्याने ती अचानक बंद पडत आहेत. टँकमध्ये पेट्रोल ऐवजी पाणी भरुन ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. जर यामुळे वाहन बिघडलं तर त्याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल ग्राहकांनी विचारला आहे.

1 thought on “पेट्रोल ऐवजी पेट्रोल पंपावर पाण्याची विक्री

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.