Wed. Oct 5th, 2022

बोकड खातो किलो भर बर्फ आणि अख्ख वर्तमान पत्र….

जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव
प्राण्यांमध्ये माणसांपेक्षा जास्त प्रेम-भाव पाहायला मिळतो ,असच एक अगळं वेगळं प्रेम जळगावच्या सलीम भाई मच्छी वाले आणि त्यांचा लाडका  बोकड  यांच्यात पाहायला मिळालं. सलीम भाई यांचा हा आवडता  बोकड दररोज मोठ्या  आवडीने  चक्क किलो भर  बर्फ आणि अख्ख  वर्तमान पत्र खातो.

जळगावच्या एम.आय.डी.सी परिसरात राहणारे सलीम भाई मच्छी वाले यांनी देवाच्या  नावाने  कुर्बान करण्यासाठी एक लहान बोकड आणले होते. मात्र या बोकडाला घरातल्यांची ऐवढी आवड निर्माण झाली आहे की सलीम भाई स्वत:ही त्याचा घरातील लहान मुलांप्रमाणे सांभाळ करायला लागले. 

आता हा बोकड तरुण झाला असुन तो दररोज एक किलो बर्फ खातो, सर्व ऋतूत त्याला बर्फ आणि थंड पदार्थ खायला आवडतात आणि त्याचा त्याला काहीही त्रास होत नसल्याने त्याचे मालक सलीम भाईही त्याला  हौसेने  आणून खाऊ घालतात.

सलीम भाई चे दुकान भर वस्तीत रस्त्यावर असल्याने जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांसाठी हा बोकड आता कौतुकाचा विषय बनला आहे. लहान मुलांसारखं हट्ट करणे, भूक लागली कि मालकाला धक्के मारून भूक लागल्याची जाणीव करुण देणे हे तिथल्या जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांसाठी नवलचं होते.

बर्फ आणि थंड पदार्थ खायला आवडणे हा सवयीचा भाग झाल्यामुळे  त्याला थंड पदार्थांचा त्रास होत नसावा असे पशु वैद्यक डॉक्टर मिलिंद पाटील यांच्या निष्कर्षणात सांगण्यात येत आहे. तसचं या प्राण्याची पचन क्षमता देखील चांगली आहे , आपल्या इतक्या वर्षांच्या सेवेत हा पहिलाच आगळा वेगळा प्राणी आपण बघितल्याचे डॉक्टर पाटील सांगतात.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.