सलमान खानने राखी सावंतची घेतली बाजू

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त शो म्हणजे बिग बॉस. यंदा या शोचं १४ वं पर्व आहे शिवाय या वेळी राखी सावंत असल्यानं आणखी जास्त लोकप्रिय वाढली आहे. कधी घरातील स्पर्धकांमधील वाद तर कधी टास्क खेळण्याची पद्धत या सगळ्यामुळे हा चर्चेत असतो.
सध्या या घरात राखी सावंत विरुद्ध जॅस्मीन असा वाद रंगला आहे. आणि या वादात आता सलमान खान याने उडी घेतली आहे. सलमान खानने राखी सावंतची बाजू घेत घरतील अनेक सदस्याना धारेवर धरलं होतं. काही दिवसांपूर्वी रंगलेल्या एका टास्कदरम्यान राखी सावंत आणि जॅस्मीन यांच्यात वादाची ठिणगी पडली.
घरातील अनेकजण राखीची खिल्ली उडवत असल्यानं सलमानने घरातल्यांची कान उघडणी केली आहे. “मुळात तुम्ही सगळे जण राखीला अनकूल समजता आणि स्वत: फार कूल आहात असं तुम्हाला वाटतं. पण तुम्हाला माहित नसेल प्रत्यक्षात सध्या तिच कूल ठरतीये. इथे मोठ मोठ्यांचा गर्व गळून पडतो. तर तुम्ही काय आहात?”, असं सलमान म्हटलं. शिवाय सलमान राखीची बाजू घेतल्यानंतर राखी ही भावूक झाली.