Jaimaharashtra news

सलमानचा ‘भारत’ लूक पाहिलात का?

सलमान खानच्या बहुचर्चित ‘भारत’ सिनेमातील सलमानचा लूक नुकताच सोशल मिडीयावर पोस्ट करण्यात आलाय. मात्र नेहमी सिक्स पॅक ऍब्जमधील डॅशिंग सलमान खान पाहण्याची सवय असणाऱ्य़ा चाहत्यांना सलमानच्या लूक पाहून आश्चर्याचा धक्काच बसलाय. पांढरी दाढी आणि पिळदार मिशी असणारा वयस्कर सलमान पाहण्याची रसिकांना सवय नाही. त्यामुळे सलमानचा हा लूक चांगलाच चर्चेत आहे. येत्या ईदला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

सलमानच्या लूकमुळे ‘भारत’ सिनेमाची उत्सुकता

सलमान खानच्या आगामी ‘भारत’ या सिनेमाचा लूक नुकताच रिलीज झाला आहे.

या मध्ये तो अतिशय वयस्कर दिसत आहे, त्यामुळे त्याच्या या सिनेमाची सध्या सगळीकडे चर्चा आहे.

त्याने याचा लूक शेअर करताना ‘जितने सफेद बाल मेरे सर और दाढी में है, उससे कहीं ज्यादा रंगीन मेरी जिंदगी रहीं हैं’ म्हटलं आहे.

भारताला स्वातंत्र्य देताना पूर्वजांनी पाहिलेली स्वप्नं आणि सध्याचा भारत या अनुषंगाने फिरणारी या सिनेमाची कथा आहे.

हा सिनेमा हिंदी व्यतिरिक्त तेलुगु, तमिळ, मल्याळम भाषेमध्येही release होणार आहे.

‘टायगर ज़िंदा है’ चा दिग्दर्शक अली अब्बास जाफर यानेच ‘भारत’ सिनेमाचं दिग्दर्शन केलंय.

सिनेमाचा 24 एप्रिल रोजी या सिनेमाचं ट्रेलर रिलीज होणार आहे.

ईदला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

दबंग खानसोबत कतरिना कैफ, जॅकी श्रॉफ, नोरा फतेही, तब्बू, दिशा पटानी अशा कलाकारांची पलटण यामध्ये पाहायला मिळणार आहे.

Exit mobile version