Fri. Aug 12th, 2022

‘भारत’च्या ‘Slow Motion’ गाण्यात सलमान-दिशाचा ‘रेट्रो लूक’!

सलमान खानच्या ‘भारत’ मधल्या लूकची चर्चा रंगत असतानाच आता या सिनेमाच्या पहिलंवहिलं गाणं रिलीज झालं आहे. या सिनेमाच्या सलमानच्या लूकमुळे आधीच हा सिनेमा कट्ट्यावर चर्चा रंगवत असताना आता दिशा पटानी सोबतच्या ‘Slow Motion’ या गाण्यामध्ये त्या दोघांची हटके जोडी दिसतेय. या गाण्यामधल्या दिशाच्या पिवळ्या साडीतल्या हॉट लूकमुळे तिच्या फॅन फॉलोअर्समध्ये वाढ होत आहे. हे गाणं रेट्रो या थीमवर शूट करण्यात आलेलं आहे.

सलमानने त्याच्या Twitter Account वर हे गाणं शेअर केलं आहे. इर्शाद कामिल याने लिहिलेल्या या गाण्याला विशाल-शेखर याने संगीत दिलेलं आहे, तर नकाश अजीज आणि श्रेया घोषालच्या आवाजाची जादू परत पाहायला मिळणार आहे.

सलमान आणि दिशाचा गाण्यामध्ये रेट्रो लूक

‘भारत’ हा सलमान खानचा सिनेमा सध्या खास चर्चेचा विषय आहे.

यापूर्वी या सिनेमामधला सलमानचा हटके लूक तो सगळीकडे पाहायला मिळाला.

त्याचे या सिनेमामध्ये बरेच वेगवेगळे लूक आहेत.

हा सिनेमा सहा दशकांची गोष्ट मांडणाऱ्या या सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज झालं.

‘Slow Motion’ या गाण्यामध्ये सलमान आणि दिशा पटानीची केमेस्ट्री पाहायला मिळतं.

पिवळ्या रंगाच्या हॉट साडीमध्ये दिशाने फार दिलखेचक अदा दाखवल्या आहेत.

सलमानने त्याच्या Twitter Account वर हे गाणं शेअर केलं आहे.

इर्शाद कामिल याने लिहिलेल्या या गाण्याला विशाल-शेखर याने संगीत दिलेलं आहे.

नकाश अजीज आणि श्रेया घोषालच्या आवाजाची जादू परत पाहायला मिळतेय.

येत्या 5 जूनला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.