Thu. May 6th, 2021

सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा शिवसेनेत; आदित्य ठाकरेंसोबत रोड शोमध्ये सामील

आगामी विधानसभा निवडणूक दोन दिवसांवर ठेपली असून अभिनेता सलमान खान यांचा बॉडीगार्ड गुरमीत शेराने नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे  यांच्या उपस्थितीत शेराने शिवसेनेत प्रवेश केला.

gurmit shera

आगामी विधानसभा निवडणूक दोन दिवसांवर ठेपली असून अभिनेता सलमान खान यांचा बॉडीगार्ड गुरमीत शेराने नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे  यांच्या उपस्थितीत शेराने शिवसेनेत प्रवेश केला. विशेष म्हणजे शेराने प्रवेश करताच आदित्य ठाकरे यांच्या प्रचारासाठी रस्त्यावर उतरला आहे. प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे सर्व राजकीय पक्ष आपल्या प्रचारासाठी सज्ज झाली आहेत. त्यामुळे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळीत रोड शो काढत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत.

कोण आहे शेरा ?

प्रसिद्ध अभिनेता सलमान खान यांचा सिक्युरिटी गार्ड म्हणून शेरा काम करत आहे.

शेरा वर्षाला 2 करोड म्हणजे महिन्याला 16 लाख रुपये कमवतो.

शिख कुटुंबातील शेराला लहानपणापासून बॉडी बिल्डिंची आवड होती.

1987 मध्ये जूनिअर मिस्टर मुंबई आणि 1998 मध्ये मिस्टर महाराष्ट्र किताब पटकवला.

शेराच्या वडिलांचा मुंबईत गॅरेज आहे.

यापूर्वी शेरा हॉलिवूडमधील सिनेमाचं भारतात शुटिंग असताना बॉडीगार्ड म्हणून काम करायचा.

1995 मध्ये सोहेल खानने सलमान खानच्या विदेशी दौऱ्याकरता शेराच्या कंपनीची सर्विस मागितली होती.

तेव्हापासून शेरा सलमान खानसाठी बॉडीगार्डचे काम करतो.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *