Mon. Dec 6th, 2021

Surgicalstrike2 : भारतीय हवाई दलाला सलाम ! – राहुल गांधी

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून जैश – ए – मोहम्मदच्या तळांवर १००० किलो वजानाचे बॉम्ब फेकत तळांना उद्धवस्त केले. भारतीय हवाई दलाची सर्वात मोठी कारवाई असल्याची माहिती समोर आली. भारतीय हवाई दलाच्या या भ्याड हल्ल्यामुळे पुलवामा हल्ल्याचा भारताने चांगलाच बदला घेतला आहे. तसेच भारतीय हवाई दलाचे राजकीय नेत्यांसह भारतीय नागरिकांनीही कौतुक केले आहे. या हल्ल्याची माहिती मिळताच राजकीय नेत्यांनी ट्विट करत कौतुक केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत हवाई दलाचे कौतुक केले. तसेच कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही ट्विट करत हवाई दलाला सलाम म्हणाले आहे.

राहुल गांधींचे ट्विट –

भारतीय हवाई दलाला माझा सलाम.

तसेच भारतीय हवाई दलाचे कौतुक करत हे ट्विट केले.

 

भारतीय हवाई दलाने हल्ला कसा केला ?

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर पहाटे हल्ला केला.

भारतीय हवाई दलाच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी जैश-ए-मोहम्मदच्या १००० किलो वजानाचे बॉम्ब फेकले.

१२ मिराज विमानांनी पाक हद्दीत घुसून हा हल्ला केल्याचे समजते आहे.

या हल्ल्यात जैश ए मोहम्मदचे अल्फा ३ कंट्रोल रूम पूर्णपणे उद्धवस्त झाल्याचेही सांगण्यात येत आहे.

तसेच दहशतवादी तळही पूर्णपणे उद्धवस्त झाले आहेत.

बालाकोट, मुझफ्फराबाद आणि चाकोटी येथील जैश ए मोहम्मदचे तळ उद्धवस्त करण्यात आले आहे.

हा हल्ला भारतीय हवाई दलाच्या विमानांनी LOCचे उल्लंघन केल्याचा आरोप पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख मेजर जनरल आसिफ गफूर यांनी

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *