Jaimaharashtra news

या वक्तव्यावर सॅम पित्रोडा माफी मागावी – राहुल गांधी

दिल्लीत 1984 साली घडलेल्या शीख विरोधी दंगलीसंदर्भात सॅम पित्रोडा यांनी दिल्लीत केलेल्या वादग्रस्त विधानावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी फेसबुक पोस्टद्वारे आपले मौन सो़डले आहे. सॅम पित्रोडा यांचे चुकीचे असून त्यांनी माफी मागितली पाहिजे असे राहुल गांधी यांनी आपल्या फेसबूक पोस्टद्वारे सांगीतलं आहे. राहुल गांधी यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याआधीच सॅम पित्रोडा यांनी देखील या वक्तव्यावर दिलगीरी व्यक्त केली आहे. या वक्तव्यावरून विरोधकांनी काँग्रेसला कोंडीत पकडले होते.

या वक्तव्यावर सॅम पित्रोडांची दिलगीरी

1984ची दंगल घडून आता घडून गेली असं वक्तव्य सॅम पत्रोडा यांनी केलं केलं होतं.

त्यांच्या या वक्तव्यावर भाजपाने चांगलेच धारेवर धरले आहे.

1984 च्या दंगलीचे आदेश त्यावेळी पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आले होते असे आरोप भाजपाने केले होतेय.

भाजपाच्या या विधानावर सॅम पित्रोडा यांनी उत्तर देताना त्यांनी असं विधान केलं आहे.

हे मी शीख बांधवांच्या जखमांवर मीठ चोळण्यासाठी बोललो नव्हतो. असं मत पत्रोडा यांनी व्यक्त केलं आहे.

माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे. असा आरोप त्यांनी केला आहे.

1984 च्या दंगलीत पंतप्रधान कार्यालयाकडून काही आदेश देण्यात आले होते हे मला अजिबात वाटत नाही.

1984 मागील पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय केलं? हे देशाला सांगावं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं खोटं बोल पण रेटून बोल हे धोरण आहे. अशी टीका त्यांनी मोदींवर केली आहे.

Exit mobile version