Wed. Oct 27th, 2021

तूरडाळीचा तडका और अंग अंग भडका- सामनातून सरकारवर टीका

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून तुरडाळीवरुन सरकारला टार्गेट कानपिचक्या देण्यात आल्या आहेत. तसंच सरकाराल तुरडाळीबाबतच्या धोरणात बदल करण्याच्यादेखील सुचना केल्या आहेत.

 

तुरडाळीबाबत सामनाच्या अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे-

आपल्या देशात दुष्काळ असला तरी शेतकरी भरडला जातो आणि दुष्काळ नसला तरी नागवला जातो. राज्यातील हजारो तूरडाळ उत्पादक शेतकरी अस्मानी कृपा होऊनही सुलतानी दुष्टचक्रात सापडले आहेत.

 

राज्य सरकारने आता तूरखरेदी केंद्रांवर नोंदणी झालेल्या सर्व शेतकऱयांची तूरडाळ हमीभावाने खरेदी केली जाईल अशी हमी दिली आहे, पण त्याशिवायही हजारो टन तूर शिल्लक राहील त्याचे आणि त्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे काय आदी प्रश्न उरतातच.

 

खरं तर यंदा तूरडाळ उत्पादन भरघोस झाल्याने शेतकरी खुशीत होता, पण तूरडाळ खरेदीतील गोंधळामुळे त्याची प्रचंड ससेहोलपट झाली. रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ त्याच्यावर आली.

 

योग्य नियोजन झाले असते, तर सरकारच्याच कानाखाली तूर‘जाळ’ निघण्याची आफत आली नसती… ‘बाजारात तुरी आणि…’ हे धोरण सरकारला बदलावे लागेल. अन्यथा त्या एका जाहिरातीप्रमाणे ‘तूरडाळीचा तडका और अंग अंग भडका’ असा अनुभव घ्यावा लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *