संभाजी भिडेंची मुक्ताफळे

सांगलीतील मिरजमध्ये शहरातील शिवाजी चौक या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक आणि पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्याला शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक संभाजी भिडे उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना भिडे आपल्या देशाला तीन बाधा झाल्या आहेत असं म्हणाले. त्यातली एक म्लेंच्छ बाधा, दुसरी अंग्लो बाधा आणि आणि तिसरी गांधी बाधा आहे असं ते म्हणाले आहेत. आणि यावरच तोडगा म्हणजे शिवछत्रपती आणि संभाजी महाराज आहेत असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले आहे.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक संभाजी भिडे हे नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडत असतात. बुधवारी सांगली येथील कार्यक्रमात बोलत असताना ही राजकारणातील चालू घडामोडींविषयी बोलताना हिंदुस्थानला तीन बाधा झाल्या असल्याचं वक्तव्य त्यांनी केलंय. म्लेंच्छ बाधा, अंग्लो बाधा आणि आणि गांधी बाधा या तीन बाधा देशाला झाल्या असल्याचं ते बोलले आहेत.
दरम्यान, याप्रकरणी आता नवीन वादाला वाचा फुटणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.