कोरोना नष्ट करण्यासाठी संभाजी भिडे यांनी सुचवला ‘हा’ उपाय

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचे सर्वाधिक बाधित आहेत. त्यातही पुणे, पिंपरी-चिंचवड भागात तसंच सांगलीतील इस्लामपूर या भागात कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. या कोरोनावर उपाय अद्याप सापडलेलेल नाहीत. तरीही सांगलीतील शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे यांनी उपाय सुचवले आहेत. यापूर्वीही त्यांनी पुत्रप्राप्तीवर आंब्याचा उपाय सुचवून वाद ओढावू घेतला होता. आतादेखील त्यांनी सुचवलेल्या कोरोनावरील उपायांमुळे त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे.

काय आहे भिडे गुरुजींनी सुचवलेले उपाय?

संभाजी भिडे यांनी कोरोनावर उपाय सुचवला आहे.

गोमूत्र, गाईचं तूप आणि बिब्बा यांमुळे कोरोनावर मात करता येईल, असं भिडे गुरुजींनी म्हटलं आहे.

हे पदार्थ तीव्र जंतुनाशक असल्यामुळे यांच्या उपायाने कोरोनावर मात करता येईल असं त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारला सुचवलं आहे. 

यासंदर्भात भिडे गुरुजींनी सांगली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी कोरोना व्हायरसला मारण्यासाठी आपण आयुर्वेदात वाचलेला उपाय सांगितल्याचं स्पष्ट केलं आहे. श्वासावाटे शरीरात जाणाऱ्या जंतूंचा नाश करण्यासाठी गोमूत्र आणि गायीचं तूप हे गुणकारी असतं. त्यमुले कोरोनाच्या रुग्णांनी दर तीन तासांनी तूप नाकात घालावं. तसंच सकाळी आणि संध्याकाळी गोमूत्र प्यायला द्यावं. या उपायांनी कोरोनाग्रस्तांच्या शरीरातील कोरोना व्हायरस नक्कीच नष्ट होईल, असा दावा भिडे गुरुजींनी केला आहे.

Exit mobile version