खंडणीप्रकरणी ‘संभाजी ब्रिगेड’च्या जिल्हाध्यक्षाला अटक

सांगलीतील इस्लामपूर येथील संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षाला 10 लाख रुपयांच्या खंडणीप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सुयोग गजानन औंधकर असं आरोपीचं नाव आहे. सहकारी संस्थांच्या सहाय्यक निबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून खंडणी स्वीकारताना त्यांना अटक केली गेली.

असं पकडलं रंगेहाथ!

जानेवारी 2017 मध्ये वाळवा येथील हुतात्मा सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूकित उमेदवारी अर्जाची प्रसिद्धी नोटीस फलकावर का केली नाही, असे  विचारत  सहाय्यक निबंधक आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल डफळे यांच्याकडे पैशांची मागणी केली होती.

पैशाची मागणी केल्याचे कळताच  पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी चौकशी केली.

खंडणीची रक्कम शुक्रवारी देण्याचे ठरले होते.

तत्पूर्वी पिंगळे यांच्या पथकाने निबंधक कार्यालय परिसरात सापळा रचला.

औंधकरने खंडणीची रक्कम घेतल्याचा सिग्नल मिळताच त्याला पकडले.

त्यांचा साथीदार कृष्णा जंगम यालाही रात्री वाळवा येथून उशिरा अटक करण्यात आली आहे.

इस्लामपूरचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री  ही कारवाई केली.

याप्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला.

Exit mobile version