Wed. Jun 29th, 2022

संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

आज संभाजीराजे यांनी पत्रकार परिषद घेत राज्यसभेची निवडणूक लढणार नसल्याच स्पष्ट केलं आहे. संभाजीराजे म्हणाले, ‘मी स्वराज्य बांधण्यासाठी सज्ज झालो आहे. मावळ्यांना एकत्र करण्यासाठी आणि गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करेल. कालपासून मला अनेक आमदारांचे फोन येत आहेत आणि राजे आपल्याला ही निवडणूक लढवयाची असल्याचे ते म्हणत होते परंतू, घोडेबाजार होणार असल्याचं मला वाटत होते. तोच घोडेबाजार टाळण्यासाठी निवडणुकीतून माघार घेत आहे.’ दरम्यान या प्रकरणी संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यावर टिका केली.

‘मुख्यमंत्र्यांनी मला शिवसेनेतून राज्यसभेची निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र, मी निवडणूक अपक्ष लढवण्याच्या भूमिकेवर ठाम होतो. मुख्यमंत्र्यांनी  मला वर्षावर बोलावलं  होतं. त्यावेळी आम्ही चर्चा केली. मुख्यमंत्री आणि माझ्यात चर्चेचा मसुदाही ठराला. परंतु, मुख्यमंत्र्यांनी दिलेला ‘शब्द फिरवला असल्याचा घणाघात संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांवर केला. राज्यसभेच्या निवडणूकांच्या तारखा जाहिर झाल्यानंतर मी मुंबईत आलो. मुंबईत आल्यावर मुख्यमंत्र्यांने दोन खासदारांना माझ्याकडे पाठवलं आणि शिवसेनेतून राज्यसभेची निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव मांडला. तसेच पक्षात प्रवेश केल्यास उद्याच उमेदवारी जाहीर करतो, असे सांगण्यात आले. मात्र, मी निवडणूक अपक्ष लढवणार असल्याचं सांगून शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिला. त्यानंतर पुढे जे झाले ते माझ्या रक्तात नाही, माझ्या तत्वात नाही. त्यामुळे आता राज्यसभा निवडणूकीतून माघार घेत असून मी आता स्वराज्य संघटना  वाढवणार. जे घडलं तो आयुष्याचा एक भाग होता, असे संभाजीराजे म्हणाले.’

संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांना आव्हान केले की, ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोणत्याही स्मारकाजवळ या आणि महाराजांना स्मरण करून मला शिवरायांच्या साक्षीने मला खोटे ठरवून दाखवा.’ तसेच याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांना का उत्तर द्यायचे?, मुख्यमंत्री बोलले तर फक्त त्यांना उत्तर देईल, असेही संभाजीराजे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.