Tue. Jun 28th, 2022

संजय राऊतांवर संभाजीराजे समर्थक नाराज

राज्यसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना संजय राऊत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी वर्ष बंगल्यावर पोहचले. त्यांच्या भेटीमागे निमित्त राज्यसभेच्या सहाव्या उमेदवारीचे असले तरी प्रत्यक्षात राऊतांना स्वतःची उमेदवारी निश्चित करायची आहे हे लपून राहिलेले नाही. बैठक आटोपल्यावर राऊतांनी मुख्यमंत्र्यांसोबत राज्यसभा निवडणुकीत संभाजीराजेंच्या उमेदवारीबाबत बैठकीत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. संभाजी राजे यांनी शिवसेनेतून राज्यसभेची जागा लढण्याचा प्रस्ताव संभाजीराजे यांच्यापुढे राऊतांनी मांडला आहे. मात्र, संजय राऊत यांच्यावर संभाजीराजे समर्थक नाराज झाले असल्याची माहिती समोर येत आहे.

संभाजीराजे समर्थक संजय राऊतांवर नाराज असून आज राजे समर्थकांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा आग्रह संजय राऊतांनी केला आहे. मात्र, संभाजीराजे राज्यसभेसाठी शिवसेनेत जाण्यास उत्सुक नाहीत. त्यामुळे संभाजीराजे समर्थक नाराज असून त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

दरम्यान, संभाजीरजे यांना शिवसेनेत येण्यासाठी संजय राऊतांकडून आग्रह होत असल्याने संभाजीराजे समर्थकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. ही नाराजी ज्या मॅसेजद्वारे होत आहे. तो मॅसेज जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला मिळाला आहे.

हा आहे मॅसेज :

शिवसेनेचे संजय राऊत म्हणजे विनाश काले विपरित बुद्धे…

छत्रपती संभाजीराजेंना पक्षात प्रवेशच करा तरच राज्यसभेस पाठिंबा अस सांगणे म्हणजे थेट छत्रपतींच्या महाराष्ट्रात अति उद्दाम पनाच म्हणावा लागणार आहे. समजले तुमची शिवसेना छत्रपतींच्या वंशजांचा किती आदर सन्मान करते…

सद्या महत्वाचा प्रश्न पडतो की महा विकास अघाडी सरकार श्री शरदचंद्र पवार साहेब व मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे चालवतात की संजय राऊत ?

शरद पवार साहेब – आम्ही आमच्या राष्ट्रवादी पक्षाची उरलेली मते संभाजीराजेंना देऊ नांदेड येथील पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे – टिव्ही मिडीयाच्या माध्यमातुन वारंवार दिसते आहे की संभाजीराजेंनी शिवसेना पुरस्कृत व्हावे परंतु संभाजीराचे महाविकास आघाडी पुरस्कृत म्हणत असल्याचे दिसते.

नानाभाऊ पटोले – आम्ही संभाजीराजेंचा आदर करतो आम्ही राजेंना सहकार्य करु परंतु संजय राऊत म्हणतायत की नाही नाही संभाजीराजेंना शिवसेना प्रवेशच करावा लागेल , हे राजकारण आहे. भविष्यात प्रचार करावा लागेल. आम्ही शिवसेनेचा उमेदवार देऊ अस वारंवार संजय राऊत म्हणत आहेत. यातुन हे समजत नाही कि पवार साहेब व ठाकरे महाविकास आघाडी चालवतात कि राऊत.

शिवसेनेला ‘चतुर्वेदी’ चालतात पण ‘छत्रपती’ नाही !!!

महाराष्ट्रातील जनता संजय राऊतांचा एका राज्यसभेच्या जागेसाठीचा हेकेखोर पना पाहत आहे. शिवभक्तांच्या रोशाला शिवसेनेला नक्किच सामोरे जावे लागेल.

दरम्यान, आम्ही हा मॅसेज व्हायरल होण्याची जबाबदारी घेत नाही आहेत.

1 thought on “संजय राऊतांवर संभाजीराजे समर्थक नाराज

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.