विधानसभा आमदारांना पाठिंबा देण्याचं संभाजीराजेंचं आवाहन

राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून सहाव्या जागेसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर करत महाराष्ट्रातील सर्व विधानसभा आमदारांना खुले पत्र लिहिले आहे. पण अद्याप कोणत्याही पक्षानं त्यांना पाठिंबा जाहीर केलेला नाही. तर दुसरीकडे सहाव्या जागेसाठी शिवसेनेने संभाजीराजे यांना पक्षात येण्याची अट घातल्याची चर्चा आहे. अपक्ष आमदारांनी आपल्याला सूचक आणि अनुमोदक म्हणून पुढे यावे, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेचे दोन उमेदवार निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे संभाजीराजेंना कोण पाठिंबा देणार, याची उत्सुकता आहे. त्यामुळे आता पुन्हा संभाजीराजेंनी राज्यातील सर्वपक्षीय आमदारांना आपल्याला समर्थन देण्यासाठी आवाहन केले आहे. या पत्रात त्यांनी निवडणूकीत विजयी होण्यासाठी आपली सर्वांच्या मदतीची गरज आसल्याची संभाजीराजेंने म्हटलं आहे.
या निवडणुकीत विजयी होण्यासाठी कोणत्याही उमेदवारास विधानसभा सदस्यांच्या ४२ मतांची आवश्यकता आहे. महाराष्ट्र विधानसभेतील पक्षीय संख्याबळाचा विचार करता, या सहा जागांपैकी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांना प्रत्येकी एक आणि भाजपला दोन जागांवरती विजय मिळविणे शक्य वाटत आहे. उरलेल्या एक जागेकरिता कोणत्याही एका पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नाही. या जागेवरती अपक्ष म्हणून मला संधी देण्यात यावी, असे आवाहन मी सर्व राजकीय पक्षांना आणि अपक्ष आमदारांना केलेले आहे.
२००७ पासून सामाजिक चळवळींच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात मी कार्यरत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी दिलेली शिकवण आचरण करीत मी राजकारण विरहित कार्य करीत आलो आहे. राष्ट्रपतीनियुक्त खासदार असताना देखील कोणत्याही बाबतीत भूमिका घेताना वैयक्तिक राजकीय भवितव्याचा विचार न करता, सदैव समाजाला दिशा देण्याचीच भूमिका घेतली. संसदेत काम करीत असताना महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हितासाठी कोणताही पक्षीय अभिनिवेश न बाळगता पक्षविरहित काम केले.
महाराष्ट्रातील सर्व विधानसभा आमदारांना खुले पत्र…
प्रति,
सर्व विधानसभा सदस्य,
महाराष्ट्र विधीमंडळआपणांस कल्पना आहेच की, महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होत आहेत. या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. या निवडणुकीत मी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करीत आहे. pic.twitter.com/i7Vwu1U7NB
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) May 17, 2022