Fri. Aug 12th, 2022

संभाजीराजेंची आज मुंबईत पत्रकार परिषद

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव संभाजीराजे यांच्यापुढे शिवसेनेकडून मांडण्यात आला. मात्र, राज्यसभेसाठी उमेदवारी शिवसेनेकडून न लढवण्याच्या भूमिकेवर संभाजीराजे ठाम आहेत. संभाजीराजे यांनी राज्यसभेसाठी अपक्ष निवडणूक लढणार असल्याचे जाहिर केल्यामुळे संभाजीराजे यांना मविआचा पाठिंबा मिळण्याची शक्यता मावळली आहे. दरम्यान, आज संभाजीराजे मुंबईत पत्रकार परिषद घेत राज्यसभा निवडणुकीबाबत सविस्तर भूमिका मांडणार आहेत. शुक्रवारी सकाळी ११ वाजता संभाजीराजे यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे त्यामुळे सर्वांचे लक्ष संभाजीराजे यांच्या भूमिकेकडे आहे.

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्ष म्हणून शड्डू ठोकणारे संभाजीराजे छत्रपती हे निवडणूक लढवणार की नाही, हे आज स्पष्ट होणार आहे. संभाजीराजे छत्रपती शुक्रवारी सकाळी ११ वाजता मुंबईतील पत्रकार परिषदेत यासंदर्भात खुलासा करतील. मोजके अपक्ष आमदार वगळता महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यापैकी कोणीही संभाजीराजे यांच्या अपक्ष उमेदवारीला पाठिंबा देण्यास नकार दिला. या पत्रकार परिषदेला राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा संघटनांच्या समन्वयकांशी चर्चा केल्याची शक्यता आहे.

दरम्यान, संभाजीराजे यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली होती. संभाजीराजे यांनी पोस्टमध्ये लिहिले, ‘मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नजरेतलं स्वराज्य घडवायचं आहे. मी त्यांच्या विचारांशी कटबिद्ध असेन. मी फक्त जनतेशी बांधील असेल.’

संभाजीराजे यांनी राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच त्यांनी महाविकास आघाडी सरकारने त्यांनी निवडणुकीत पाठिंबा द्यावा, अशी मागणी केली होती. राज्यसभेची सहाव्या जागेसाठी शिवसेना उमेदवार निवडणूक लढवणार असल्यामुळे शिवसेनेने संभाजीराजे यांना शिवसेनेत प्रवेश करून शिवसेनेकडून निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडला. मात्र, संभाजराजे निवडणूक अपक्ष लढवणार असल्याच्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे शिवसेनेच्या दृष्टीने संभाजीराजे विषय संपला असल्याचे जाहिर केले. त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीत संभाजीराजे यांना मविआचा पाठिंबा मिळणे अशक्य आहे.

राज्यसभेसाठी शिवसेनेकडून दोन संजय

राज्यसभेसाठी शिवसेनेतर्फे खासदार संजय राऊत आणि कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिल्याने त्यांच्या उमेदवारीचा विषय मागे पडला असून शिवसेनेकडून दुसऱ्या उमेदवारीसाठी संजय पवार यांची वर्णी झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.