Wed. Jun 29th, 2022

‘संभाजीराजेंचा विषय आमच्या दृष्टीने संपला’

गेल्या काही दिवसांपासून राज्यसभेच्या जागेसाठी चर्चा सुरू आहे. यासाठी संभाजीराजेंनी शिवसेनेचा उमेदवार व्हावे इतकीच अपेक्षा आमची अपेक्षा होती मात्र त्याला संभाजीराजेंनी नकार दिल्याने संभाजीराजेंचा विषय आमच्या दृष्टीने संपला असल्याचा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेचा उमेदवार कोण असेल याची चर्चा सुरू आहे. यामध्ये कोल्हापूरचे शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार आणि कोल्हापूरचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची नावे यादीत होती. मात्र संजय पवार यांची उमेदवारी शिवसेनेने जाहीर केल्याने याला आता पुर्णविराम मिळाला आहे.

खासदार संजय राऊत म्हणाले की संभाजीराजेंने यांनी आमच्या पक्षाचे उमेदवार व्हावे एवढीचं आमची माफक अपेक्षा होती. आम्ही ४२ मतांचा कोटा संभाजीराजेंना द्यायला तयार होतो, राजकीय पक्षात छत्रपती घराण्यातलं कोणी जात नाही  हा समर्थकांचा दावा योग्य नाही, मात्र संभाजाराजेना राजकीय पक्षांचा वावड का ? असा सवाल शिवसेना खासदार यांनी केला आहे. राजघराण्यातले अनेक जण विविध पक्षांमध्ये आले आहेत, पक्षांकडून लढले आहेत, सिनियर शाहू महाराजही शिवसेनेत आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.