Sun. Mar 29th, 2020

खा. छत्रपती संभाजीराजे यांनी पूरग्रस्तांसाठी 5 कोटींचा निधी

गेल्या दहा दिवसापासून कोल्हापूरला महापूराने विळखा घातला आहे. अनेक गावांत पाणी गेल्याने हजारो लोक पाण्यात अडकले होते. अनेकांची घरे, संसार उद्धवस्त झाले आहेत. आता पाणी ओसरल्यानंतर या लोकांना दैनंदिन गरजांसाठी पायपीट होणार आहे.

गेल्या दहा दिवसापासून कोल्हापूरला महापूराने विळखा घातला आहे. अनेक गावांत पाणी गेल्याने हजारो लोक पाण्यात अडकले होते. अनेकांची घरे, संसार उद्धवस्त झाले आहेत. आता पाणी ओसरल्यानंतर या लोकांना दैनंदिन गरजांसाठी पायपीट होणार आहे. सध्या या ठिकाणी पाणी, वीज, आणि अन्न देखील मिळत नाहीये. काही भागात सरकारने दिलेली मदतही पोहचू शकत नाही. यात खा. छत्रपती संभाजीराजे यांनी पूरग्रस्तांसाठी 5 कोटींचा निधी जाहिर केला.

 खा. छत्रपती संभाजीराजे यांनी पूरग्रस्तांसाठी 5 कोटींचा निधी

कोल्हापूरमधील पूरपरिस्थीती पाहता सगळीकडून कोल्हापूरला मदत होतं आहे. पुणे, बीड, नांदेड, अशा महाराष्ट्रातील अनेक भागांतून कोल्हापूरला मदत होतं आहे. कोल्हापूर मधील महापूरग्रस्त भागातील नागरिकांच्या मदतीसाठो गेले आठवडाभर खा. संभाजीराजे यांनी युद्धपातळीवर काम केले आहे.

खा. संभाजीराजे हे संवेदनशीलतेने पूरग्रस्तांच्या घरापर्यंत जाऊन मदतीसाठी कार्यरत असून पूरग्रस्त भागात ज्या प्रकारची मदत हवी असेल ती स्वतः पुरवठा करण्याचे नियोजन करत आहेत. पूरपरिस्थीतीत स्वत: जावून आढावा घेत आहे.

गेल्या आठवडा भर जिवाची पर्वा न करता या कामात झोकून देत या भागातील लोकांना थेट भेटून त्यांची अडचण जाणून घेऊन योग्य ती मदत स्वतः संभाजीराजे व त्यांचे मावळे पूरग्रस्तांपर्यंत मदत पोहोचवण्याचे काम अहोरात्र करताना दिसत आहेत.

खा.संभाजीराजे छत्रपती यांनी पूरग्रस्तांसाठी 5 कोटींचा निधी जाहीर केला आहे. माझ्या निधीतून 5 कोटी रुपये महापुराने प्रभावित क्षेत्रात खर्च करण्याचा संकल्प मी केला आहे. मला हे माहिती आहे की रयतेच्या सेवेकरिता हे काहीही नाही. ही एक सुरुवात आहे. शिवशाहू विचारांसाठी आणि समाज सेवेसाठी माझं संपूर्ण जीवनच समर्पित आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *