Thu. Sep 29th, 2022

समीर वानखेडे जात पडताळणीत निर्दोष

मुंबईतील क्रुझ ड्रग्स प्रकरणामुळे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगला होता. वानखेडे हे मुस्लीम असल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. पण, आता समीर वानखेडे यांनी मुस्लीम धर्म स्वीकारल्याचा पुरावा नाही, असा अहवाल जात पडताळणी समितीने दिला आहे. त्यामुळे वानखेडेंनी मोठा दिलासा मिळाला आहे.

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी मुस्लीम धर्म स्विकारला असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. त्यामुळे वानखेडे यांनी आधी राष्ट्रीय जातपडताळणी समितीकडे धाव घेतली होती. त्यानंतर आता राज्य जात पडताळणी समितीचा अहवाल समोर आला आहे. यामध्ये वानखेडे यांनी मुस्लीम धर्म स्वीकारला नसून ते हिंदु महार असल्याचा खुलासा केला आहे.

समीर दाऊद वानखेडे का समीर ज्ञानदेव वानखेडे ? ज्ञानदेव वानखेडे हे दाऊद वानखेडे कसे ? आज सरकारी रेकॉर्डवर, समीर हिंदू महारजन्म झाला. वडील हिंदू का मुसलमान ? समीर यांचा जन्म झाला तेव्हाच्या कागदावर समीर मुसलमान नंतर सरकारी नोकरी कागदावर समीर नवबौद्ध असल्याचा उल्लेख होता. मलिक यांनी याबद्दल वानखेडे यांच्या वडिलांचे कागदपत्र सुद्धा दाखवली होती. परंतू या सर्व गोष्टीला अहवाल जात पडताळणी समितीने खोटे ठरवले आहे. आणि निकाल समीर वानखेडे यांच्या बाजुने लावला आहे. समीर वानखेडे मुस्लिम समाजाने नसून ते महार समाजाचेच आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.