समीर वानखेडेंनी ‘निकाहनामा’ फेटाळला

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा निकाहनामा ट्विटरच्या माध्यमातून सादर केला होता. परुंत समीर वानखेडे यांनी निकाहनामा फेटाळला असल्याची माहिती एनसीबी सूत्रांकडून मिळाली आहे.
नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून अनेक आरोप केले आहेत. ट्विटरवर दिलेल्या कागदपत्रांच्या आधारे समीर वानखेडे मुस्लिम असल्याचा दावा नवाब मलिक करत आहेत. तसेच निकाह करताना समीर यांच्याकडून काही हजार रुपयांची मेहरची रक्कम देण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र नवाब मलिकांनी सादर केलेला निकाहनामा समीर वानखेडे यांनी फेटाळून लावल्याची माहिती एनसीबी सुत्रांकडून मिळाली आहे.