Thu. Dec 2nd, 2021

समीर वानखेडेंनी अनन्याला फटकारलं, म्हणाले…’हे प्रोडक्शन हाऊस नाही’

क्रुझवरील ड्रग्जपार्टीप्रकरणात आर्यन खान एनसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. आर्यनच्या चौकशीदरम्यान दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आर्यनच्या चॅटमुळे अभिनेत्री अनन्या पांडेसुद्धा एनसीबीच्या रडारवर आहे. अनन्याचा लॅपटॉप आणि मोबाईल जप्त करून तीला एनसीबीकडून चौकशीचे आदेश देण्यात आले होते.

पहिल्या दिवशी अनन्याने समाधानकारक उत्तरे न दिल्यामुळे एनसीबीने अनन्याला दुसऱ्या दिवशी पुन्हा चौकशीसाठी कार्यालयात बोलवले. दुसऱ्या दिवशी ११ वाजता एनसीबीने अनन्याला हजर राहण्याचे आदेश दिले. परंतु ती दुपारी २ वाजता पोहचली. त्यामुळे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे अनन्यावर चांगलेच संतापले. अनन्याला एनसीबी कार्यालयात येण्यास उशीर झाल्यामुळे एनसीबीच्या अधिकाऱ्यांना तीन तास अनन्याची वाट पहावी लागली.

‘तुला ११ वाजता बोलावले होते, तू २ वाजता कशी काय येऊ शकतेस? प्रोडक्शन हाऊस समाजलीस काय, पण हे एनसीबी कार्यालय आहे, हे लक्षात ठेव’, अशा शब्दात एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी अनन्याला चांगलेच फटकारले.

ड्रग्जप्रकरणी आर्यनच्या चौकशीदरम्यान आर्यनची व्हॉट्सऍप चॅट एनसीबीच्या हाती लागली. त्यामध्ये आर्यन आणि अनन्याचे गांजा खरेदीबद्दलचे चॅट आढळले. या चॅटमध्ये आर्यनने मॅसेज केले की, काही जुगाड होऊ शकतो का? त्यावर अनन्याने, मी व्यवस्था करते असे उत्तर दिले. या चॅटबाबत अनन्याला प्रश्न विचारले असता आम्ही सिगारेटच्या व्यवहाराबद्दल बोलत होते असे तीने एऩसीबीला सांगितले.

क्रुझवरील ड्रग्ज प्रकरणाचा खुलासा एनसीबी लवकरच करणार असून चौकशीदरम्यान अनेकांची नावे समोर येत आहेत. याप्रकरणी आर्यन, अरबाज, मुनमुन यांना अटक करण्यात आली असून त्यांचा जामीन अर्जसुद्धा फेटाळण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *