समीर वानखेडेंनी जातप्रमाणपत्र प्रसिद्ध करावे, नवाब मलिकांचे आव्हान

आर्यन खान ड्रग्जप्रकरणी मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडेंवर अनेक आरोप करण्यात येत आहेत. कालच नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा जातप्रमाणपत्र ट्विटरवर शेअर केला होता. जातप्रमाणपत्रात समीर वानखेडेंचे नाव समीर दाऊद वानखेडे असे होते. वानखेडेंनी त्यांच्यावर केलेले सर्व आरोप फेटाळले. त्यामुळे समीर वानखेडेंनी त्याचे जात प्रमाणपत्र प्रसिद्ध करण्याचे आव्हान नवाब मलिकांनी दिले आहे.
‘मी काल जाहीर केलेला समीर वानखेडे यांचा जन्मदाखला खोटा असल्याचे त्यांच्या कुटुंबाकडून सांगण्यात येत आहे. तो दाखला खोटा असेल तर खरा दाखला वानखेडे यांनी प्रसिद्ध करावा. समीर वानखेडे यांनी आपले जातप्रमाणपत्र प्रसिद्ध करावे. तुम्ही ते स्वत: करत नसाल तर आम्ही जन्मदाखल्याप्रमाणे जातीचा दाखलाही शोधून काढू,’ असा इशारा मलिक यांनी दिला आहे.
‘काल मी जो जन्मदाखला शेअर केला होता. त्यातून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. मी हिंदू मुस्लिम म्हणून हे मुद्दे मांडत नाही आहे. भाजप ह्याला धार्मिक रंग द्यायचा प्रयत्न करत आहे. समीर खान, आर्यन खान मुस्लिम आहे म्हणून नवाब मलिक हे सगलं करत आहेत. असा आरोप भाजप करत आहे पण धर्माच्या नावाने कधीही राजकारण केलेले नाही, असे मलिक म्हणाले.