Maharashtra

समीर वानखेडे यांची मलिकांविरोधात तक्रार

जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून अमलीपदार्थ नियंत्रण विभागाचे मुंबईचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना नुकताच दिलासा मिळाला आहे. यानंतर आता नवाब मलिकांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. नवाब मलिक यांच्याविरोधात गोरेगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर वानखेडे यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारी अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यात अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसीच्या कलम ५००,५०१, ​​अनुसूचित जाती/जमाती कायद्याच्या ३(१) अन्वये नवाब मलिक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

गोरेगाव विभागाचे एसपी या प्रकरणाची अधिक चौकशी करणार आहेत. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले होते. हे आरोप करताना वानखेडे कुटुंबीयांबद्दल काही आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला होता, असा आरोप करण्यात आला आहे. जात पडताळणी समितीकडे चार जणांनी वानखेडेंच्या विरोधात तक्रार केली होती. त्यामध्ये नवाब मलिक यांचाही समावेश होता. परंतु, समीर वानखेडे यांना जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून दिलासा मिळाला होता. समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांनी मुस्लीम धर्म स्वीकारल्याचं कुठेही सिद्ध होत नाही. त्यामुळे त्यांचे हिंदू महार हे जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निकाल जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिला होता. यानंतर दिलासा मिळताच वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात तक्रार केली.

manish tare

View Comments

  • 😍 Barbara just viewed your profile! More info: https://letsg0dancing.page.link/go?hs=63776eba5698656234de33441230110e& 😍 says:

    ryx4wz

Recent Posts

प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला पतीचा काटा

सोलापूर येथील केकडे नगरातील दशरथ नागनाथ नारायणकर या तरूणाचा गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास खुन झाला. प्रियकराच्या…

5 days ago

गॅस वाहतूक करणारा टॅंकर नदीत कोसळला

 मुंबई-गोवा महामार्गावर गुरूवारी दुपारच्या सुमारास एक भीषण अपघात घडला आहे. एक गॅस कंटनेर थेट पुलावरुन…

6 days ago

मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत श्रीकांत शिंदे

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी श्रीकांत शिंदे यांचा एक फोटो ट्विट केला आहे. या…

6 days ago

शिवसेनेचा ‘प्लॅन बी’ तयार

शिवसेनेतील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेनं शिंदे गट आणि ठाकरे गट दोन्ही…

6 days ago

‘शाहांचा दौरा ठाकरेंना झोंबला’

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी गोरेगावच्या नेस्को संकुलात झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात भाजपावर टीका केली.…

6 days ago

‘ज्यांना जायचे आहे त्यांनी निघून जा’

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेतून भाजपा आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.…

6 days ago