Jaimaharashtra news

डॉ.गोविंद पानसरे हत्या प्रकरणी संशयित आरोपी समीर गायकवाडला सशर्त जामीन

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर


काँम्रेड गोविंद पानसरे हत्ये प्रकरणी संशयित आरोपी समीर गायकवाड याला सशर्त जामीन मंजूर झाला आहे.

 

जिल्हा सत्र न्यायालयात आज समीर गायकवाडच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली आहे. 25 हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर समीर गायकवाडला जामीन मंजूर झाला

आहे.

 

पण, हा जामीन मंजूर करताना अनेक अटी कोर्टाने घातल्या आहेत. समीर गायकवाडला महाराष्ट्राबाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यात

प्रवेश करायला बंदी घालण्यात आली आहे.

 

तसेच दर रविवारी तपास यंत्रणांकडे हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. समीर गायकवाडला त्याचा पासपोर्ट कोर्टाच्या ताब्यात देण्याते आदेश आज कोर्टाने

सुनावणी दरम्यान दिले आहेत. जामीनकाळात समीर गायकवाड याला निवासाचा पत्ता देणंसुद्धा कोर्टाने बंधनकारक केलं आहे.

Exit mobile version