Tue. Dec 7th, 2021

Samsung चे ‘हे’ 2 स्मार्टफोन्स झाले स्वस्त!

गेल्या काही काळापासून स्वस्तात मस्त अशी ख्याती पसरलेले स्मार्टफोन म्हणजे Mi चे मोबाईल्स. या फोन्समध्ये साऊंड क्वालिटी, फोटो क्वालिटी सगळं चांगलं असूनही किंमत कमी असल्यामुळे युजर्सचा ओढा या फोन्सकडे वाढला. मात्र यामुळे Samsung, Nokia, Oppo यांसारख्या ब्रांड्सना मोठं आव्हान निर्माण झालं. आता Mi टला टक्कर द्यायला Samsung आपले 2 smartphones कमी किमतीत विकणार आहे.

Samsung चे हे 2 फोन होणार स्वस्त!

सॅमसंग गॅलेक्सी A7 आणि सॅमसंग गॅलक्सी A9 हे 2 फोन स्वस्त होणार आहेत.

4 GB RAM असणाऱ्या गॅलक्सी A7 ची किंमत आता 15,990 रुपये आहे.

6 जीबी रॅम असणाऱ्या फोनची किंमत 19,990 आहे.

गॅलक्सी A9 च्या 6 जीबी रॅमच्या मॉडेलची किंमत 25,990 आहे.

8 GB RAM साठी टॉप-एंड वेरिएंटची किंमत 28,990 आहे.

हे दोन्ही फोन्स सध्या Amazon, Flipkart यांसारख्या online stores वर स्वस्तात मिळत आहेत. सॅमसंगने आपल्या Galaxy A10, A20, A30 या मोबाइल्सची किंमतही गेल्या आठवड्यात कमी केली आहे. त्यामुळे मोबाईल युजर्सचा चांगलाच फायदा होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *