‘सनातन’चं फर्मान! कृत्रिम तलावात गणेश विसर्जन धर्मविरोधी?
गणेशोत्सवामध्ये विसर्जन कृत्रिम तलावात करावं की वाहत्या पाण्यात यावरून वाद निर्माण झालाय. पुणे महानगरपालिकेने बांधलेल्या घाटावर गणेशविसर्जन करण्यास ‘सनातन संस्थेच्या’ लोकांनी विरोध केलाय…
गणेशोत्सव म्हणजे प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो महाराष्ट्रातल्या गणेशोत्सवाला मोठा इतिहास आहे सध्या वाढत चाललेल प्रदूषण यामुळे गणेशमूर्ती आणि निर्माल्य हे कृत्रिम हौदात विसर्जित करावे असे आवाहन महापालिका दरवर्षी करत असते. पुण्य़ात मात्र ‘सनातन’चे कार्यकर्ते वाहत्या पाण्यातच गणेशमूर्ती आणि निर्माल्य विसर्जित करावे, असा नागरिकांना आग्रह करत होते. मात्र हे सगळं होत असताना महापालिका आणि पोलीस हतबल झालेले दिसले.
गणपती उत्सव ही हिंदू परंपरा आणि मोठा उत्सव आहे आणि गणेश विसर्जन हे शास्त्रोक्त पद्धतीने वाहत्या पाण्यातच केले जावे. याउलट हौदामध्ये जर गणपती विसर्जन तर मूर्तीची विटंबना होते आणि नदीमध्ये जनावर धुतात कपडे धुतात. यामुळे जास्त प्रदूषण होते. सरकारने आधी या गोष्टींकडे लक्ष द्यावे, आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत असं हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.
राज्य सरकारचा आदेश आहे की वाहत्या पाण्यात विसर्जन करु नये. असं असताना कुठल्या धर्माच्या आधारे हे सर्व संघटना करत आहेत,यामुळे प्रदूषणाचे जे नियम आहेत ते सर्व धाब्यावर बसवले जात आहेत आणि महापालिका देखील यात लक्ष घालत नाहीये अस मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं व्यक्त केलंय…
सामान्य नागरिक मात्र वाहत्या पाण्यात गणेश मूर्ती विसर्जन करण्यास विरोध करतायेत,भविष्यात नद्या स्वच्छ ठेवायच्या असतील तर गणेश मूर्ती हे हौदातच विसर्जित केलं पाहिजे आणि निर्माल्य कुंडीत टाकलं पाहिजे, या मताचे सर्वसामान्य नागरिक आहेत.
यानिमित्ताने पुन्हा एकदा गणेश विसर्जनादरम्यान सनातन संस्था आणि सामाजिक संस्था यांच्यामध्ये वाद निर्माण झालाय. महापालिकेने पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात कृत्रिम घाट तयार केले आहेत. मात्र याला सनातन साधक त्याठिकाणी उभा राहून गणेश विसर्जन वाहत्या पाण्यातच करा असा संदेश देत आहेत, त्यामुळे हा वाद आता कसा थांबणार हे पाहावं लागेल.