Sun. Aug 25th, 2019

उमरखाडीच्या आईची ‘ही’ वैशिष्ट्यं तुम्हाला माहीत आहे का?

0Shares

गणेशोत्सवाप्रमाणेच मुंबईमध्ये उत्साहाने साजरा होणारा सण म्हणजे नवरात्री. देवीच्या नवरात्री सणानिमित्त अनेक घरांत घटस्थापना होते, तर मंडळांतर्फे देवीच्या मूर्तीची स्थापना होते. दक्षिण मुंबईतील उमरखाडी परिसरातील मंडळाचा ‘उमरखाडीचा राजा’ हा गणपती जसा गणेशोत्सवात आकर्षणाचा विषय असतो, तशीच नवरात्रीत ‘उमरखाडीची आई’ या देवीच्या दर्शनालाही भाविकांची रीघ लागते.

‘उमरखाडीची आई’ या देवीचं वैशिष्ट्य म्हणजे नवरात्रोत्सवानिमित्त या देवीची संपूर्ण मूर्ती चंदन लाकडापासून साकारण्यात येते. चंदनाच्या देवीची प्रतिष्ठापना करणारं हे मुंबईतील एकमेव मंडळ आहे.

 

4c8a82bc-049e-4e3a-ae3f-082b2bc3aad0_1.jpg

 

 कशी झाली ‘उमरखाडीच्या आई’ची स्थापना?

स्वातंत्र्यसैनिक बाळू चांगू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली देवीची मूर्ती साकारण्यात आली. या देवीचं वाहन असणारा सिंह हा चंदनाच्या एकसंध लाकडापासून तयार केलाय. या देवीचे मूर्तिकार वसई येथील ख्रिश्चन समाजाचे सिक्वेरा बंधूनी सन 1970 साली घडवली.

 

a7d31e91-5644-45bb-97c4-5026c03e0eda.jpg

 

मूर्तीची वैशिष्ट्यं-

ही संपूर्ण मूर्ती फोल्डिंगची आहे.  

या देवीच्या मूर्तीची घडण दोन पध्दतीनं करण्यात आली आहे.

या देवीची मूर्ती एक वर्ष उभी तर दुसऱ्या वर्षी बसलेली असते.

देवीची मूर्तीचे नेत्र केवळ सजीवच नव्हे, तर बोलके वाटावे, यासाठी खास ऑस्ट्रेलियावरून काचेच्या बनावटीच्या लेन्सेस मागवण्यात आल्या.

Untitled23.jpg

  

डोंगरी येथील उमरखाडी सार्वजनिक गणेशोत्सव – नवरात्रोत्सव मंडळ आणि नायगाव बीडीडी चाळ येथील ‘चंदनाची देवी’ अशी वैशिष्ट्यपूर्ण आहे. या देवीच्या दर्शनासाठी केवळ मुंबईतूनच नव्हे, तर दूरवरूनही भक्तगण देवीच्या दर्शनासाठी येत असतात.

Untitled67.jpg

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *