निरुपम यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर संदीप देशपांडेंचा पलटवार
‘संजय निरुपम यांच्यात मुंबई बंद करण्याची हिम्मत होती तर मग त्यांनी मुंबई बंद करण्यासाठी राज ठाकरे यांच्याकडे भीक का मागितली’ अशी तिखट प्रतिक्रिया मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिली.
‘मुंबई ही मराठी माणसाचीच आहे आणि संजय निरुपम यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी मुंबई बंद करुन दाखवावीच’ अस आव्हान मनसेने दिलं आहे.
काँग्रेस च्या भैय्या ला जाहीर आव्हान एकदा मुंबई बंद करून दाखवचं
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) October 8, 2018
निरुपमांच्या वक्तव्यानंतर मनसे आक्रमक
मनसे सोशल मीडियावर पोस्ट केलं कार्टून….