Wed. Jun 19th, 2019

सॅंडविच विक्रेत्याला कॉल करणं तरुणीला पडली महागात!

0Shares

‘मोबाईलवर कॉल करा, सॅंडवीच आणून देतो’, असं सांगून 21 वर्षीय तरुणीशी ओळख वाढवून तिच्यावर 39 वर्षीय सॅंडवीच विक्रेत्याने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात घडला. या प्रकरणी चेंबूर येथे राहणाऱ्या राकेश धुमक या सॅंडवीज विक्रेत्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याला न्यायालयाने 20 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

काय घडलं नेमकं?

चेंबूरच्या मस्का चाळीत राहणारा राकेश धुमक याचा सॅंडवीच विक्रीचा व्यवसाय आहे.

त्यातून त्याची वाशी येथे राहणाऱ्या 21 वर्षीय पीडितेशी ओळख झाली.

त्याने पीडितेचा मोबाईल क्रमांक मिळवून तिच्याशी मैत्री केली.

एकत्र फोटो काढलेला फोटो फेसबूकवर व्हायरल करण्याची धमकी दिली.

राकेशने पीडित तरूणीला मोटारसायकलवरून ठाण्यातील लॉजवर नेत तिच्यावर अत्याचार केला.

या प्रकरणी पीडीत तरूणीने ठाणेनगर पोलीस ठाण्यात धाव घेत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी त्याला अटक केली असून या प्रकरणी ठाणेनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.

या प्रकरणी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की अनोळखी व्यक्तीला आपला मोबाईल नंबर देऊ नये. फेसबुकवर मैत्री करू नये जेणेकरून अशा घटना होणार नाहीत. त्यामुळे नागरिकांनी देखील सतर्क राहावं, असं आव्हान ठाणे नगर पोलिसांनी केलंय.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: