Thu. Aug 5th, 2021

चर्चा तर होणारच ना! विरोधकांची फौजच खडसेंच्या घरात

 

जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव

 

वाट मोकळी करत विरोधकांची संघर्ष यात्रा दाखल झाली थेट जळगावच्या मुक्ताईनगरमधल्या खडसेंच्या दारात. मग काय एकच खळबळ उडाली.

 

सरकारविरोधात काढलेली संघर्ष यात्रा थेट खडसेंच्याच दारात पोहोचल्यानं राजकीय वर्तुळातही एकच चर्चा रंगली. सगळ्यांचेच कान टवकारले.

 

कारण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जयंत पाटील अशी विरोधकांची फौजच संघर्ष यात्रेची वाट सोडून खडसेंच्या घरात पोहोचली होती.

 

बंद दारामागे काय चर्चा घडली याबाबत कोणीच काहीच अधिकृतरित्या बोललं नाही. पण, जळगाव जिल्हा सहकारी बँकेवरची कारवाई आणि खडसेंची नाराजी यावरच चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.

 

त्याबरोबरच संघर्ष यात्रेत खडसे सहभागी होणार की आता खडसे भाजपची वाट सोडून विरोधकांमध्ये सहभागी होणार का हीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *