Jaimaharashtra news

सांगलीत तेरा तासात कोरोनाने कुटूंब उध्वस्त

सांगली: सांगली जिल्ह्यात अवघ्या तेरा तासात कोरोनाने एकाच कुटुंबातील ३ जणांचा बळी घेतला सल्ल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पती पत्नी आणि मुलाचा मृत्यू झाला आहे. शिराळा तालुक्यातील शिरशी येथे ही घटना घडली. यामुळे संपूर्ण कुटुंब उद्धवस्त झाले आहे.

सहदेव विठ्ठल झिमुर ( वय ७५) यांना कोरोनाची लागण झाल्यावर गेली २२ दिवसांपासून खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते.त्या नंतर त्यांच्या पत्नी सुशीला ( वय ६६) तसेच मुलगा सचिन ( वय ३०) यांनाही कोरोनाची लागण झाली होती. दीड महिन्यांपूर्वी मुंबई येथे खाजगी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा सचिन टाळेबंदी म्हणून शिरशी येथे आला होता. यामुळे त्यांनाही त्याच खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

सहदेव यांचा मृत्यू होऊन अजून बारा तास होतात न होतात तोच सायंकाळी पाच वाजता पत्नी सुशीला यांचे निधन झाले.त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू असतानाच एक तासात म्हणजे सायंकाळी सहा वाजता मुलगा सचिन याचा मृत्यू झाला.
अवघ्या तेरा तासात एकाच कुटुंबातील ३ जणांचा मृत्यू झाला. सचिनचा एका वर्षांपूर्वी विवाह झाला होता.ते दोघे पतीपत्नी मुंबईत रहात होते. सचिन यास दोन विवाहित बहिणीसुद्धा आहेत.

Exit mobile version