Jaimaharashtra news

…अन् पाण्याने भरलेल्या बादलीत पडून चिमुरडीचा मृत्यू झाला

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली

 

तुमचं तुमच्या चिमुरड्यांकडे लक्ष आहे का? असं विचारावं लागत आहे. कारण तुमचं थोडं जरी दुर्लक्ष झालं तरी ते तुम्हाला जिवापेक्षा अधिक असलेल्या तुमच्या जिवावर बेतू

शकते.

 

सांगलीच्या अमनगी दाम्पत्याला असंच आपल्या जिवाला मुकावं लागले आहे. त्यांच्या 14 महिन्यांच्या चिमुरडीचा पाण्यानं भरलेल्या बादलीत पडून मृत्यू झाला.

 

अलिना असं या चिमुरडीचं नाव आहे. अलिना कणीस खात होती. तिच्या हातातलं कणीस बादलीतील पाण्यात पडले. ते काढण्यासाठी गेलेल्या अलिनाचा तोल गेला आणि

ती पाण्यात पडली. तिच्या कुटुंबानं तिला पाहिले. मात्र तोपर्यंत वेळ गेली होती. अलिनाचा गुदमरून मृत्यू झाला होता.

Exit mobile version