Jaimaharashtra news

म्हणून महापालिकेवर महिलांचा पायताण आणि बांगड्या मोर्चा

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली

सांगलीत दारु बंदीसाठी महिलांनी एल्गार केला. संतप्त महिलांनी महापालिकेवर धडक मोर्चा काढला.

 

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर महापालिका रस्ते हस्तांतरणाच्या भूमिकेवर महिला आक्रमक झाल्यात आणि त्यांनी पायताण आणि बांगड्या मोर्चा काढला.

 

दारुच्या व्यवसायासाठी अनेक ठिकाणी महामार्गाला लागून असणारे रस्ते पालिकेत हस्तांतरण करण्याचा पालिकेचा निर्णय असून याला अनेक महिलांचा विरोध आहे. याविरोधात महिलांनी आंदोलन केलं.

Exit mobile version