खरा हिरो! सांगलीत भगिनींनी ‘जीव वाचवणाऱ्या’ भावाला बांधली राखी

मुसळधार पावसामुळे झालेल्या पूरस्थितीमुळे नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत. नागरिकांना वाचवण्यासाठी स्थानिक पोलीस, आर्मी आणि एनडीआरएफच्या पथकाने मदत केली आहे. पाण्याची पातळी ओसरत असल्यामुळे आर्मी आणि एनडीआरएफचे पथक पुन्हा परतत असल्यामुळे सांगलीतील भगिनींनी पथकाला राखी बांधून रक्षा बंधन साजरा केला आहे.
सांगलीतील भगिनींनी बांधली जीव वाचवणाऱ्या भावाला राखी –
गेल्या आठवड्याभरापासून पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती असल्यामुळे नागरिकांचे बचावकार्य सुरू आहे.
पूराचे पाणी ओसरत असल्यामुळे पथकं परतत असल्याने सांगलीतील भगिनींनी त्यांना सुंदर निरोप दिला आहे.
काही दिवसांवरच रक्षा बंधन असल्यामुळे खऱ्या अर्थाने लोकांचे जीव वाचवणाऱ्या आर्मी आणि एनडीआरएफच्या पथकाला बंधू म्हणून राखी बांधली आहे.
पुन्हा आपल्या कामाला रुजू होत असलेल्या आर्मी आणि पथकाला निरोप देताना राखी बांधली आहे.
राखी बांधून फुलांचा वर्षाव करत निरोप दिला आहे.
तसचे आर्मी आणि एनडीआरएफच्या पथकाने केलेल्या कार्याला सांगलीकरांनी सलाम केला आहे.