टाळेबंदीच्या काळात मशिदीत एकत्रित नमाज पठण

सांगली: सांगली जिल्ह्यात कडक टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. लोकांनी गर्दी करु नये असे वारंवार सांगितले जात असले, तरी मिरज येथील एका मशिदीमध्ये एकत्रित नमाज पठण करण्यासाठी लोक एकत्र आले होते.

टाळेबंदीच्या काळात परवानगी नसतानादेखील एकत्र आलेल्या २१ जणांविरोधात आणि अन्य १५ ते २० अज्ञातांविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. मिरज शहर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्या प्रकरणी या २१ जणांवर कारवाईकरण्यात आली आहे.

Exit mobile version