Mon. Jul 22nd, 2019

75 पेटंट मिळवणारा सांगलीचा ‘फुंगसुक वांगडू’

0Shares

एका माणसाच्या नावे साधारण किती पेटंट असू शकतात बरं ? सांगलीच्या सचिन लोकापुरे यांच्या नावे सगळ्यात जास्त पेटंट असल्याची  दखल घेत इंडिया बुक आणि लिम्का बुक रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली आहे. लोकापुरे हे संशोधक असून त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील सूक्ष्म रोग निदानात उपयोगात येणारी डिजिटल यंत्रे विकसित केली आहेत. त्यांनी त्यांच्या संशोधनाची नोंद भारतीय केंद्रीय पेटंट कार्यालयाकडे करत आतापर्यंत साधारण त्यांच्या नावे तब्बल 75 पेटंट रजिस्टर केले आहेत.

75 पेटंट मिळवणारा आहे तरी कोण ?

सांगलीतील सचिन लोकापुरे यांच्याकडे जास्त पेटंट असल्याची दखल घेत त्यांची इंडिया बुक आणि लिम्का बुक रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे.

आतापर्यंत त्यांच्या नावे तब्बल ७५ पेटंट रजिस्टर आहेत.

लोकापुरे यांनी एम फार्मसीचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.

शिक्षण संपल्यावर त्यांनी सॅगलो कंपनीची स्थापना करून मायक्रोस्कोपमधील डिजिटल उपकरणांचे संशोधन  सुरू केले.

वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी  संशोधनाला सुरूवात करत आज ३२ व्या वर्षी वैद्यकीय क्षेत्रातील सूक्ष्म रोग निदानात उपयोगात येणारी डिजिटल यंत्रे  विकसित केली आहेत.

बऱ्याचदा वैद्यकीय क्षेत्रात अनेक रोगांचे सूक्ष्म आणि योग्य निदान करण्यासाठी लागणारी मायक्रोस्कोपी उपकरणे परदेशातूनच मागवावी लागतात.

शिवाय ही उपकरणे महाग असतात.

या उरकरणांमधून रिपोर्ट बनवण्यासाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणी ही एक वेगळीच अडचण समोर असते.

मात्र यावर शक्कल लढवत लोकापुरे यांनी स्वतःच्या संशोधनातून भारतीय बनावटीची उपकरणे तयार केली आहेत.

त्यांच्या या संशोधनातून त्यांना उत्तमरीत्या यशदेखील मिळाले आहे.

बत्तीस वर्षीय लोकापुरेंनी त्यांच्या संशोधनाची नोंद भारतीय केंद्रीय पेटंट कार्यालयाकडे केली आहे.

सचिन लोकापुरे यांनी संशोधनातून तयार केलेली उपकरणे भारतीय वैद्यकीय क्षेत्राला नक्कीच एक नवी दिशा देणार आहेत.

भारतीय वैद्यक क्षेत्रात आतापर्यंत मायक्रोस्कोपमधील डिजिटल उपकरणे विकसित केली जात नव्हती. पण लोकापुरेंचे हे पाऊल या संदर्भात महत्त्वाचे ठरणार आहे.

त्यामुळे हे क्रांतीकारक पाऊल असल्याचा दावा लोकापुरेने केला आहे.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: