ओव्हरटेक न करु दिल्याने बाईकस्वाराची एसटी चालकाला मारहाण
जय महाराष्ट्र न्यूज, सांगली
एसटी चालकाला मारहाण ही काही नवी घटना नाही. तशीच एक घटना हातकणंगले जवळच्या निमशिरगाव घडली.
मोटारसायकलस्वारांनी सांगली बस स्थानकात घुसून चालकाला मारहाण करण्यात आली. चालक उमाजी बाबर हे कोल्हापूरहुन सांगलीला एसटी घेऊन येत होते.
यावेळी एसटी ट्रॅक्टरला ओव्हरटेर करताना समोरुन येणाऱ्या गाडीला रस्ता मिळाला नाही. त्यामुळे गाडी शेजारील शेतात गेली. यानंतर हल्लेखोरांनी बसचा पाठलाग करुन बस थांबवून चालकाला मारहाण केली.
चालक बाबरला मारहाण करुन हल्लेखोर फरार झाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा एसटी चालकाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला.